मॉल्स मधील विक्रेते तसेच दुकानदारांना त्यांच्याजवळ जमा झालेली रक्कम दररोज बँकेत जमा करण्याचे RBI ने सुचवले असून व हि रक्कम ते रु.२००० ते रु.५०० च्या पटीत काढू शकतात. त्यांना हि रक्कम काढण्यावर बंधन नाही. रु.१००० व रु.५०० च्या चलनी नोटा रद्द झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत नोटांचे प्रमाण कमी झाले आहे. व व्यापाऱ्यांनी पैसे जवळ न बाळगता ते बँकेत जमा करावेत व बाजारात नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात. हा यामागील हेतू आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी सध्या असलेल्या निर्बंधामुळे काही जण बँकेत पैसे जमा करू इच्छित नाहीत असे RBI च्या निदर्शनास आले असून त्यानुसार २९ नोव्हेंबर नंतर पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात येणार नाहीत. व व मोठ्या रकमेची मागणी असल्यास रु.२००० व रु.५०० च्या नोटा दिल्या जाव्यात असे RBI ने सुचविले आहे. नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी ८.४५ लाख करोड रुपयांच्या रु.५०० व रु.१००० च्या चलनी नोटा विविध बँकामध्ये जमा केल्या असून १० नोव्हेंबर - २७ नोव्हेंबर दरम्यान बँका व ATM मधून देखील २.१६ लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. त्यात रु. ३३,९४८ करोड रुपयांच्या रु.५०० व रु.१००० च्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. रु.८,११,०३३ करोड रक्कम जमा करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket