ओयो हॉटेल्स , हि ५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली स्टार्टअप कंपनी असून हॉटेल्स रूम बुक करण्याचे काम करते. व २०२३ पर्यंत हि कंपनी देशातील सर्वात मोठी हॉटेल्स चेन ठरेल. कंपनी साध्य मिडल ईस्ट, सौथ ईस्ट एशिया व यूरोप या देशांमध्ये विस्तारात आहेत. अशी माहित कंपनीचे २०१३ मध्ये कंपनीने त्यांचे पहिले हॉटेल गुरगाव येथे सुरु केले. जगभरात ५०० शहरांमध्ये त्यांचे ३,३०,००० रूम्स सुविधा आहेत. भारतात १८० शहरे व चीन मध्ये २६५ शहरांमध्ये कंपनी कार्यरत आहे. ओयो कंपनी हॉटेल्स ओनर्स बरोबर टाय अप करून त्यांच्या स्टाफ करिता ट्रैनिंग देणे व इतर अंतर्गत सुधारणा करून वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाश्यांना हॉटेल्स रूम्स बुक करण्याची सुविधा देते. त्यामध्ये कंपनी २५% कमिशन मिळविते. कंपनीचे काम इंडोनेशिया, मलेशिया, युके ,दुबई, अबुधाबी, शारजाह मध्ये विस्तारत आहे. कंपनीने चीन व इतर देशांमध्ये विस्तार करण्यासाठी $१ बिलियन चा फंड उभारला आहे.