डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे यांनी ओला बरोबर भागीदारी करून ग्राहकांना कॅब व ऑटो बुकिंग साठी फोनपे अँप्लिकेशन ची सुविधा देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्ड चे प्रमाणीकरण न करता थेट बँक खात्यातून पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या सूचनेनुसार, रु.२०००/- हुन कमी रक्कम या पद्धतीने हस्तांतरित केली जाऊ शकते. फोनपे यासाठी प्रवाश्यांकडून कार्ड वापरकरिता स्टँडिंग इंस्ट्रक्शन घेईल. सध्या हि सुविधा केवळ ICICI बँक व HDFC बँक कार्ड धारकांकरिता सुरु करण्यात आली आहे. व पुढील काही महिन्यात इतर महत्वाच्या बँकांच्या ग्राहकांना हि सुविधा वापरता येईल. अशी माहिती कंपनीचे को फाऊंडर राहुल चारी म्हणाले. रेड बस वरून तिकीट बुक करण्याकरिता देखील या कंपनीने सुविधा सुरु केली आहे. सध्या रेड बस वरील १०% बुकिंग हे फोनपे अँप्लिकेशन द्वारे केले जाते. फोनपे चे संस्थापक समीर निगम यांनी माहिती दिली कि, भविष्यात या पद्धतीचे ३० नवे अँप्लिकेशन तयार करण्याचे ध्येय आहे. कंपनीच्या एअरटेल मनी,जीओमनी , फ्रीचार्ज या अँप्लिकेशन्स चा फायदा ग्राहकांना होत आहे. ओला कंपनीने मोबिक्विक व फोनपे या दोन्ही कंपन्यांशी भागीदारीत कामास सुरवात केली आहे.