बनावटीपासून सुरक्षा देण्याकरिता १ एप्रिल पासून सर्व मोटर गाड्या टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सहित देण्यात येतील.अशी घोषणा पार्लमेंट ने गुरुवारी केली. १ एप्रिल पासून उत्पादकांकडून डीलर ला देण्यात येणाऱ्या सर्व गाड्या ह्या टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट व थर्ड रजिस्ट्रेशन मार्क सहित देण्यात याव्यात. अशी सूचना दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली. सेंट्रल मोटर व्हेईकल रुल १९८९ कायद्यात हा नियम समाविष्ट केला जाईल. व HSRP ऑर्डर आक्षेप / सूचनांसाठी सार्वजनिक डोमेन मध्ये देण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली. राज्याचे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ऑफिसर, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ,सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर चे प्रतिनिधी यांनी या निर्णयास पाठींबा दिला. थर्ड रजिस्ट्रेशन मार्क हा क्रोमियम बेस होलोग्राम स्टिकर असून तो गाडीच्या आतील बाजूस चिकटवतात. त्यावर रजिस्ट्रेशन चे डिटेल असतात. तर HSRP हा नंबर प्लेट वर पुढील व मागील बाजूस लावण्यात येईल.