रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून ते म्हणाले, प्रामुख्याने राज्य मालकीच्या बँकांच्या अनुत्पादित कर्जात घट झाली आहे. या क्षेत्राकरिता गव्हर्नन्स रिफॉर्म साठी स्टेकहोल्डर बरोबर चर्चा केली जाईल. फायनान्शिअल स्टॅबिलिटी रिपोर्ट व ट्रेंड अँन्ड प्रोग्रेस इंडियन बँकिंग रिपोर्ट नुसार, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेत घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मार्च २०१८ मध्ये असलेले रु.९.६२ लाख करोड चे अनुत्पादित कर्ज रु.२३,००० करोड ने कमी झाले आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये १०.८% असलेला ग्रॉस NPA रेशो मार्च २०१९ मध्ये १०.३% तर सप्टेंबर २०१९ मध्ये १०.२% असेल. या क्षेत्राकरिता कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत यावर स्टेकहोल्डर्स बरोबर चर्चा केली जाईल. व बँक कामकाजावर मर्यादा आणणारे अथवा सक्ती आणणारे फ्रेमवर्क नसेल .अशी त्यांनी माहिती दिली.