कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार यांचे अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रमाला शुभेच्छा ! अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रम मराठी उद्योग जगतासाठी एक पथदर्शक आहे ! एक वेगळ्या प्रकारे मराठी समाजात विचार मांडण्याचा प्रयत्न ! एक चांगला पायंडा व एक चांगली प्रथा ! माधवराव भिडेंनी मराठी माणसांमध्ये बांधलेले ब्रिज आहेत ते कधीही पडणारे नाहीत ! हे पिढ्यांपिढ्यांचे ब्रिज त्यांनी बांधले आहेत ! या कार्यक्रमात सर्व बिझनेस क्लबना एकत्र करून कार्यक्रम केला जातो व कोणत्याही एका क्लबला महत्व दिले जात नाही ! विचारांची नेटवर्किंग होणे आवश्यक आहे ! अर्थसंकेत प्रस्तुत "उद्योजकांची दिवाळी पहाट २०१८" दिमाखदार कार्यक्रम उत्साहात संपन्न ! पुणे येथील चतुःशृंगी मंदिर येथे महाराष्ट्रातील १००० हुन अधिक उद्योजकांची उपस्थिती ! श्री. रोहित राजेंद्र पवार, श्री. हणमंतराव गायकवाड, श्री. प्रदीप लोखंडे, श्री. गिरीश चितळे, डॉ. सुहास डावखर, श्री. भगवानराव साळुंखे, डॉ. रविराज अहिरराव, डॉ. प्रवीर पारकर यांची विशेष उपस्थिती ! महाराष्ट्रातील २० विविध उद्योजकीय संस्थांचा झाला सन्मान ! अधिक माहितीसाठी संपर्क - ९८१९४९९२७३ / ८०८२३४९८२२