देशातील सर्वात मोठी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला टॅक्स वगळून झालेला नफा २२% नि अधिक आहे. या आर्थिक वर्षात हि रक्कम रु.१००८/- करोड आहे. कंपनीला परदेशातील कामगिरीतून रु.१६३/- करोड चा नफा झाला आहे. कंपनीने इन्व्हेस्टमेंट बँकर ची नियुक्ती केली असून कंपनी लवकरच शेअर बाजारात येईल. कंपनीच्या रिटेल बिझनेस मध्ये ७०% ची वाढ झाली आहे. तसेच जागतिक प्रीमियम उत्पन्नात २१.२७% ची वाढ झाली आहे व हि रक्कम रु.२२,२७९/- करोड आहे. कंपनीची नेट वॊर्थ रु.३४,७१६/- करोड आहे.