केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार शहरातील प्रमुख इमारतीवर ६५,००० सोलर सिस्टीम बसविण्यात येणार असून दरवर्षी २० मेगावॉट सौरऊर्जा निर्माण करणे शक्य होईल. ऊर्जा मंत्रालयाच्या एनर्जी एफिशिअन्सी सर्विसेस लिमिटेड मार्फत शहरात सर्वेक्षण होणार असून विविध संस्थांच्या सौरऊर्जा प्रकल्पात सहभागी होण्याच्या क्षमतेविषयी माहिती घेतली जाईल. यात दोन प्रकारचे मॉडेल असून पहिल्या मॉडेल अंतर्गत एखादी संस्था हि सिस्टीम स्थापित करण्याकरिता भांडवली खर्च करणार असल्यास एनर्जी एफिशिअन्सी सर्विसेस लिमिटेड कडून सोलर सिस्टीम चे डिझाईन, पुरवठा, स्थापना करून देण्यात येईल. यातून निर्माण होणारी ऊर्जा त्यांना मोफत वापरता येईल दुसऱ्या मॉडेल अंतर्गत EESL सोलर सिस्टीम स्थापनेची खर्चाची जबाबदारी स्वतः घेईल. परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेसाठी संस्थांना रु.3.८७ /- हा दर आकारला जाईल.