गोल्डलोंन फायनान्स क्षेत्रातील मुथूट फायनान्स ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात या तिमाहीत ४६% ची वाढ झाली आहे. लोन असेट मध्ये १२% वाढ झाली आहे. निव्वळ नफ्यात १२% ची वाढ होऊन हि रक्कम रु.३२२/- करोड आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षात निव्वळ नफा रु.११८०/- करोड आहे. मागील वर्षी हि रक्कम रु.८१०/- करोड होती. श्रेलंकेतील व्यवसायात ७०% ची वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. त्यांच्या मायक्रो फायनास या उपकंपनीचे लोन पोर्टफोलिओ मध्ये ११४% ची वाढ झाली आहे. हि रक्कम रु.५६७/- करोड आहे.