सोमवारी MRF लिमिटेड च्या शेअरने रु.६०,०००/- हुन अधिक चा सर्वाधिक उच्च किमतीचा टप्पा गाठला. या शेअर ची किंमत रु.६०,१४०/- होती. MRF हा सर्वाधिक महाग डोमेस्टिक स्टॉक आहे. मागील दशकभरात या शेअरच्या किमतीत ४७५९% ची वाढ झाली आहे. २४ मार्च अखेर प्रति शेअर किंमत रु. ५९,१८४.१५/- होती. १ जानेवारी २००१ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत रु.४६३.९५/- होती. आनंद राठी इन्स्टिट्यूशनल रिसर्च ने एका अहवालात म्हटले कि MRF लिमिटेड च्या महसुलात आर्थिक वर्ष २०१७ ते २०१९ दरम्यान १६%,१७%,२३% अशी वाढ होईल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, रबराच्या किमतीत फेब्रुवारी पासून २५% ची घट झाली असून रबर उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये रबराचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे व पुढील काही काळ हे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. रबराच्या किमतीत होत असलेल्या घटीमुळे येत्या काळात टायर बनविणाऱ्या कंपन्यांच्या महसुलात व मार्जिन मध्ये वाढ होईल. असे स्टुअर्ट अँन्ड मेकर टिक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने म्हटले आहे. ३१ डिसेंबर २०१६ अखेर ,कंपनीला निव्वळ नफा रु.२८८.०८/- करोड झाला असून त्यात ३०% ची घट आढळली. तर या तिमाहीत मागील वर्षी हि रक्कम रु.४१५/- करोड होती.