कमोडिटी क्षेत्रातील MCX कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ७२% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७.३३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६.३०/- करोड होती. एप्रिल- जून तिमाहीत ऑपरेशनल उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ७२.८७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५९.१९/- करोड होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे म्हणाले,सरासरी दैनिक ट्रेंड व्यापारात ३०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.२४,३६०/- करोड आहे. ऑपरेटिंग परफॉर्मन्स मध्ये वाढ झाली आहे. नॉन ऍग्री सेगमेंट मध्ये कमोडिटी काँट्रॅक्टस मध्ये या तिमाहीत वाढ झाली आहे. व अधिक नाविन्यपूर्ण प्रॉडकट्स निर्मिती वर लक्ष केंद्रित केले आहे.