डिसेंबर २०१८ अखेर तिमाहीत कमोडिटी एक्सचेंज क्षेत्रातील MCX कंपनीला एकूण उत्पन्नात ४३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०९.१०/- करोड आहे. डिसेंबर २०१७ अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ७६.५२/- करोड होती. ऑपरेटिंग उत्पन्नात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७६.९३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६२.८१/- करोड होती. कर,व्याज, घसारा सहित एकूण उत्पन्नात ८३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५३.१३/- करोड आहे. या तिमाहीत निव्वळ नफा १२४% ने वाढला असून हि रक्कम रु. ४१.९९/- करोड आहे. एप्रिल-डिसेंबर २०१८ या दरम्यान कंपनीला रु. २८७.७९/- करोड चे एकूण उत्पन्न मिळाले आहे. तर ऑपरेटिंग महसूल रु. २२०.९०/- करोड आहे. या तिमाहीत सरासरी दर दिवशी च्या टर्नओव्हर मध्ये ३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६,६१४/- करोड आहे.