कार मेकिंग क्षेत्रात देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी मारुती सुझुकी इंडिया पुढील आर्थिक वर्षात दोन नव्या कार लाँच करणार आहे. त्यांच्या नुकत्याच लाँच झालेल्या दोन नव्या कार मॉडेल चे सुरक्षा नियमावली अनुसार टेस्टिंग सुरु आहे. नव्या कार पैकी पहिली कार हि कंपनीच्या प्रसिद्ध कॉम्पॅक्ट वॅग्नर कार चे नवीन व्हर्जन असेल. २०१८-१९ मध्ये सिदन सियाझ व एर्टिगा यांचे नवे व्हर्जन कंपनीने लाँच केले होते. नवीन सुरक्षा नियमावलीनुसार, कंपनीचे ७ कार मॉडेल असून इतर ३ कार मॉडेल मध्ये सुधारणा करण्यात येत आहे. शासकीय नियमानुसार, कार बनविणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या पुढील सुधारित कार मॉडेल्स मध्ये एअर बॅग्स, सीट बेल्ट रिमांईंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे.