जागतिक स्तरावरील सर्वाधिक मोठी ऑइल कंपनी सौदी आर्मको ने बुधवारी घोषित केल्यानुसार, हि कंपनी भारतातील तीन मोठ्या ऑइल कंपन्यांशी भागीदारीत भव्य रिफायनरी कॉम्प्लेक्स ची उभारणी करेल. महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे हा प्रकल्प बांधला जाणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन , भारत पेट्रो कॉर्प , हिंदुस्थान पेट्रो कॉर्प या कंपन्यांशी सौदी आर्मको ने हा करार केला आहे. या प्रकल्पाची प्रति दिवस १.२ मिलियन बॅरेल्स ऑइल शुद्धीकरण क्षमता असेल. भारतातील इंधन व पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट ची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प साहाय्य करेल. या प्रकल्पाची एकूण किंमत $४४ बिलियन अपेक्षित आहे. सौदी आर्मको चे अध्यक्ष अमीन नासर यांनी सांगितले कि, जागतिक स्तरावरील विस्तार प्रकल्पामध्ये भारतातील हा प्रकल्प महत्वपूर्ण असून यामुळे भारताशी आमचे संबंध अधिक दृढ होतील. कंपनी या प्रकल्पाकरिता गुंतवणूक भागीदार देखील नियुक्त करणार आहे. तेल विक्रीत वाढ करण्याच्या दृष्टीने सौदी आर्मको कंपनीने US , मलेशिया , फ्रेंच येथील कंपन्यांबरोबर कामास सुरवात केली आहे. क्रूड ऑइल तेल पुरवठा करण्याव्यतिरिक्त कंपनी रिफायनिंग ,मार्केटिंग , पेट्रोकेमिकल या क्षेत्रात देखील भारतास मदत करेल. या कंपनीचे २०१८ अथवा २०१९ मध्ये सौदी एक्सचेन्ज वर लिस्टिंग होईल. त्यानंतर या कंपनीचे देशाबाहेरील एक्सचेन्ज वर लिस्टिंग संदर्भात निर्णय सौदी शासनाकडून घेतला जाईल.