आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ६ एप्रिल २०१८ ! शेअर बाजारात सुस्ती ! निफ्टी निर्देशांक ६.४५ अंकांनी तर सेन्सेक्स ३०.१७ अंकांनी वर ! निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला ! मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले असून रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर ! रिझर्व्ह बँकेचा चालू वित्त वर्षांसाठी महागाईचा अंदाज ४.७ ते ५.१ टक्के ! चालू वित्त वर्षांत देशाचा विकास दर ७.४ टक्के असेल - रिझर्व्ह बँक ! व्यापारी बँकांसह सर्वच यंत्रणांना बिटकॉइनसारख्या आभासी चलनाशी संबंधित कोणतीही सेवा पुरविण्यास मज्जाव ! तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनसाठी डेबिट, क्रेडिट कार्डची सुविधा देण्याचा विचार ! २०१७-१८ मध्ये अमूल कंपनीची उलाढाल रु. २९,०८५/- करोड ! JSW स्टील कडून क्रूड स्टील उत्पादनाचा उच्चांक ! भारत केवळ ५ वर्षात सिलिकॉन व्हॅली घडवू शकेल. : वर्ल्ड बँक एन एस ई मध्ये ल्युपिन, बी पी सी एल, टायटन, हिंदुस्थान पेट्रोलियम, अदानी पोर्ट्स तेजीत ! बी एस ई मध्ये इंडिया बुल्स व्हेंचर्स, व्हिडीओकॉन, सोभा, जी एम आर इन्फ्रा, जय कॉर्प तेजीत !