भारतातील खाजगी क्षेत्रातील IDFC बँक लिमिटेड ने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, अनुत्पादित कर्ज तरतुदीत वाढ झाल्याने निव्वळ नफ्यात ७६% ची घट झाली आहे. ३१ मार्च १८ अखेर तिमाहीत बँकेला रु. ४१९.३ मिलियन चा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु.१.७६ बिलियन चा नफा झाला होता. एकूण अनुत्पादित कर्ज एकूण कर्जाच्या ३.३१% आहे. मागील वर्षी या तिमाहीत हे प्रमाण २.९९% होते. ऑक्टोबर-डिसेंबर १७ दरम्यान तिमाहीत हे प्रमाण ५.६२% होते. आपत्कालीन खर्च तरतुदीत वाढ होऊन हि रक्कम रु.२४२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.४.८/- करोड होती.