अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या विक्रीतून महिंद्रा अँन्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्विसेस रु.२०००/- करोड ची भांडवल उभारणी करणार आहे. या विक्रीची सुरवात १० जुलै २०१७ पासून होईल. यावर बोलताना कार्यकारी संचालक रमेश अय्यर म्हणाले, पावसाळ्यानंतर कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होत असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यामध्ये कामगिरी चांगली आहे. या प्रकारात निश्चित व्याजदर मिळणार असून ३ वेगवेगळ्या श्रेणीत हे रोखे उपलब्ध असतील. श्रेणी १, श्रेणी २,श्रेणी ३ यामध्ये ७ वर्ष, १० वर्ष, १५ वर्ष असा कालावधी असून त्यात अनुक्रमे ७.७५%, ७.९०%,७.९५% असा व्याजदर मिळेल. या वितरणानंतर टायर II प्रकारातील भांडवल श्रेणीसाठी कंपनी पात्र ठरेल. फार्म व इन्फ्रा कॅश फ्लो माध्यमातून कंपनी या वर्षी कामगिरीत २०% ची वाढ करेल असा विश्वास आयएर यांनी व्यक्त केला