अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" सन्मान सोहळा संपन्न ! सर्वच क्षेत्रात ब्रँड विषयक जागरूकता अत्यावश्यक - श्री. संदिप कुलकर्णी महाराष्ट्रातील जेष्ठ व प्रस्थापित उद्योजकांची आणि मान्यवरांची उपस्थिती ! अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम ! सातत्याने अनेक वर्ष व्यवसाय केल्याने व्यवसायाचे ब्रँड मध्ये रूपांतर होण्यास मदत होते परंतु कोणताही व्यवसाय एका रात्रीत ब्रँड बनत नाही तर त्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, अनेक वर्षे सातत्याने उत्कृष्ट वस्तू व सेवा देत राहणे, अनेक अडचणींवर मात करून व्यवसाय टिकून ठेवणे, या व अशा विविध गोष्टी अंतर्भूत असतात. महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी पहिल्यांदाच या प्रकारचा ब्रँड अवेरनेस कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येक ब्रँडला एक मूल्य असते व त्या मूल्यामुळे उद्योग - व्यवसायाची किंमत बाजारात वाढते. सर्वसामान्यपणे ब्रँडेड वस्तू अथवा सेवा विकत घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कोक हा शब्द जगात सर्वात जास्त बोलला जातो. कोकाकोला २०० हुन अधिक देशांमध्ये विकला जातो. या २०० देशांत मिळून कोकाकोलाची जी संपत्ती आहे त्यापेक्षा अनेक पट फक्त कोक या ब्रँडची किंमत आहे. ब्रँड व्हॅल्यू वर अनेक व्यवसाय बँकाकडून कर्ज उभारतात. अनेक व्यवसाय फक्त ब्रँड विकून करोडो अरबो रुपये कमवितात. ब्रँड, ब्रॅंडिंग आणि ब्रँड व्हॅल्यू या संकल्पना तशा खुप जुन्या असल्या तरी महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये त्याबाबत फारशी जागरूकता नाही म्हणूनच या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यक्रमाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून कोणत्याही सहभागी ब्रँडला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही. अध्यक्षीय भाषणात श्री. संदिप कुलकर्णी यांनी सर्वच क्षेत्रात ब्रँड विषयक जागरूकता अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. उद्योग जगतचं नव्हे तर चित्रपट - नाटक तसेच अभिनेते यांना सुद्धा त्यांचे ब्रँड व्हॅल्यू माहित असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जेष्ठ अभिनेते व निर्माता श्री. संदिप कुलकर्णी, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे श्री. माधवराव भिडे, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे स्ट्रॅटेजी हेड श्री. शंकर जाधव, एन एस डी एल चे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री. शंतनु भडकमकर, महाराष्ट्र व्यापारी पेठचे श्री. अनंत भालेकर, इंडियन स्कुल ऑफ इ बिझनेसचे श्री. नयन भेडा, मनसेचे उपाध्यक्ष श्री. अरविंद गावडे, पंढरी संचारचे संस्थापक संपादक श्री. बाळासाहेब बडवे, विनकोट कलर्स अँड कोटिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदिप ताम्हाणे व बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर श्री. अशोक दुगाडे यांच्या हस्ते विविध ब्रँडचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी ब्रँड, ब्रॅंडिंग आणि ब्रँड व्हॅल्यू या विषयावर स्वतःचे मनोगत व्यक्त केले. सन्मान सोहळ्यात बी व्हाय पाध्ये पब्लिसिटी, फ्रँटेज मिडिया, केसरी टूर्स, खो गो, माधवबाग, पितांबरी, रुरल रिलेशन्स, सेंट अँजेलोज , टी जे एस बी बँक, तळवलकर जिम, वास्तू रविराज, वामन हरी पेठे, एम इंडिकेटर या ब्रँडचा 'मोस्ट पॉप्युलर', 'मोस्ट इनोव्हेटिव्ह' आणि 'बेस्ट कस्टमर सर्व्हिस' या तीन विभागात "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" म्हणून गौरव करण्यात आला. या सर्व ब्रँडनी त्यांच्या ब्रँडचा प्रवास आणि पुढील वाटचाली बद्दल माहिती दिली. अर्थसंकेतच्या वेबसाईटवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्होटिंगच्या माध्यमातून लोकांनी दिलेल्या मतानुसार या ब्रँडचा विविध विभागात सन्मान करण्यात आला. टिम महा ब्रँड तर्फे कै. डॉ. सचिन कारंडे यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यकमाचे सर्व क्रिएटिव्ह ज्यांनी केले त्या श्री. महेश कारंडे यांचे ते बंधू होते. बुधवार १९ जुलै २०१७ रोजी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेमध्ये शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई हा सन्मान सोहळा संपन्न झाला. महा ब्रँड व्होटिंग वेबसाईट व संपुर्ण टेकनॉलॉजी ज्यांनी सांभाळली ते जी फाईव्ह वेब सर्व्हिसेसचे श्री. तुषार भगत, प्रायोजक इशा टूर्सचे श्री. आत्माराम परब, शेअर मार्केट ट्रेनर श्री. अवधूत साठे, महा ब्रँडची सोनेरी व लखलखती ट्रॉफी बनविणारे जीवनकलाचे श्री. तपस्वी शेडगे, माउली असोसिएट्च्या उज्वला बाबर, उद्यमी महाराष्ट्राचे श्री. ऋषिकेश कदम, दीपक वर्ल्डचे श्री. दिपक पावस्कर, महा ब्रँडचा एनिमेटेड व्ही डी ओ ज्यांनी बनविला ते थ्री डी आयडियाजचे श्री. विजय ठेले, एल ई डी स्क्रीन ज्यांनी प्रायोजित केली ते क्लासिक बिझनेस सोल्युशनचे श्री. गिरीश मळगावकर पंढरी संचार या पंढरपूर येथील प्रसिद्ध वर्तमान पत्राचे श्री. अनिरुद्ध बडवे, वेळोवेळी विविध प्रकारची मदत करणारे श्री. प्रदिप मांजरेकर व सौ मानसी मांजरेकर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी जनरल श्री. नरेंद्र बगाडे, श्री. विनित बनसोडे, ठाणे वर्तमान न्यूज चॅनेलचे श्री. नितीन बोरसे, स्पिक आऊट वर्तमानपत्राचे संपादक श्री. गजेंद्र जैन, स्मार्ट उद्योजक मॅगझिनचे श्री. शैलेश राजपूत आणि अर्थातच संपूर्ण क्रिएटिव्ह ज्यांनी सांभाळले ते श्री. महेश कारंडे यानजी हि संकल्पना आणि हा कार्यक्रम सर्वांसमोर आणण्यासाठी योगदान दिले.