शासनाने देशभरात डिजिटल पेमेंट ला प्रोत्साहन देण्यासाठी 8 करोड डिजिटल व्यवहारांमधून १५,००० विजेते निवडण्यात येणार आहेत. यात ४ विभाग असून ९ नोव्हेंबर २०१६ ते २१ डिसेंबर २०१६ दरम्यान केल्या जाणाऱ्या डिजिटल व्यवहारांमधून १५,००० विजेते निवडण्यात आले आहेत. कॅशलेस इकॉनॉमी प्रचलित करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २ नव्या योजनांचे उदघाटन केले. लकी ग्राहक योजना व डिजि धन व्यापार योजना असे या योजनांचे नाव आहे. ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये मोबाईल बँकिंग व पेमेंट ला प्रोत्साहित करण्यासाठी या योजना असून ख्रिसमस निमित्ताने हा लकी ड्रॉ काढण्यात येतील व विजेत्यांच्या खात्यात रु.१०००/- जमा केले जातील. NPCI ने याबाबत बोलताना माहिती दिली कि, विजेत्यांना त्यांच्या बँकेकडून यासंदर्भातील SMS पाठवला जाईल. व पुढील २४ तासांत हि रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. चार विभागांमध्ये USSD (१०० विजेते), UPI (१५००), आधार पेमेंट सिस्टिम (१५००), रूपे (११,९००) काढण्यात येतील. १२५ करोड नागरिकांमध्ये ७५ करोड क्रेडिट व डेबिट कार्ड चा वापर करतात. तर ४५ करोड हे नियमित डिजिटल पेमेंट चा वापर करतात. १४ एप्रिल २०१७ ला हे लकी ड्रॉ विजेते घोषित करण्यात येतील. हि योजना छत्तीसगढ मधील पळनेर या छोट्या गावात राबवण्यात आली आहे. या गावाची लोकसंख्या १९६१ असून या गावातील नागरिक व व्यापारी यांना डिजिटल पेमेंट चे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांनी तेथील व्यापाऱ्यांना POS टर्मिनल वापरासंदर्भात सूचना केल्या. कॉमन सर्विस सेन्टर ची स्थापना देखील गावात करण्यात आली.