भारतातील एअरलाईन कंपनी जेट एअरवेज ला २०१७-१८ आर्थिक वर्षात कमकुवत ऑपरेटिंग कामगिरीमुळे तोटा सहन करावा लागला आहे. मार्च १८ अखेर तिमाहीत देखील कंपनीला तोटा झाला आहे. हि कंपनी लिस्टेड कंपनी असून मार्केट शेअर मध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च १८ अखेर तिमाहीत कंपनीला रु. १०४५/- करोड चा तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. ६०१.७१/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. विक्रीतून उत्पन्न ९% ने वाढले असून हि रक्कम रु. ५९२४.८५/- करोड आहे. इतर उत्पन्न ८२% ने घटले असून हि रक्कम रु. ८२२/- करोड आहे. मागील तिमाहीत कंपनीने काही प्लेन्स व लॅन्ड पार्सलची विक्री केली होती.एकूण खर्च २५% ने वाढला असून हि रक्कम रु. ७०९१.१५/- करोड आहे. मेंटेनन्स खर्चात ५६% ची वाढ झाली आहे. २०१७-१८ आर्थिक वर्षात कंपनीला रु. ६३४/- करोड चा तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी कंपनीला रु. १४४२/- करोड चा नफा झाला होता.