US व्हिसा मिळवण्याची नवी कठोर नियमावली तसेच डॉलर च्या तुलनेत रुपयाची ५% नि वाढलेली किंमत याचा परिणाम भारतीय IT सर्विस कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीवर होईल. २०१८ मध्ये देखील हि कामगिरी स्थिर राहील असे नोमुरा सिक्युरिटीस चे अश्विन मेहता यांनी सांगितले. US व युरोप हे देश प्रामुख्याने भारतीय आऊटसोर्सिंग कंपन्यांचे ग्राहक असून बदलत्या चलन दराचा परिणाम त्यांना सोसावा लागेल. चौथ्या तिमाहीत या कंपन्या साधारणतः नव्या प्रकल्पावर काम करतात. कॉंग्निझंट कंपनीने माहिती दिल्याप्रमाणे यावर्षी त्यांच्या विक्रीत ८ ते १०% ची वाढ होईल. व टाटा कंसल्टंसी सर्विसेस ने याबाबत माहिती दिली नाही. HCL च्या कामगिरीत देखील १२-१४ % ची वाढ होईल. कारण त्यांना इंजिनिअरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात बऱ्याच संधी आहेत. TCS ला US बँका व रिटेल कंपन्यांकडून डिजिटल डिस्क्रिशनरी कामातून महसूल निर्मिती होईल. यामुळे कंपन्यांकडून होणाऱ्या पगार वाढीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे...