आजच्या ठळक बातम्या मंगळवार ४ सप्टेंबर २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक ६२.०५ अंकांनी तर सेन्सेक्स १५४.६० अंकांनी खाली ! अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा गुरुवार ६ सप्टेंबर २०१८ रोजी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ! हवाई वाहतूक क्षेत्राला १३ हजार कोटींचा तोटा ! रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पूकारलेले सामूहिक रजा आंदोलन मागे ! एप्रिल-जुलै दरम्यान रु.५.४०/- लाख करोड ची वित्तीय तूट ! एच डी एफ सीने रु.१०००/- करोड चे एस्सार स्टील च्या कर्जाची केली विक्री ! वेंकटक्रिष्णन यांची वेदांता रिसोर्सेसच्या सी ई ओ पदी नियुक्ती ! जुलै मध्ये भारतात प्रमुख उद्योगांच्या विकास दरात घट ! कोळसा उद्योगात जून महिन्याच्या तुलनेत विकास दर १.८% ने घटला ! क्रूड ऑइल उत्पादनात ५.४% ची घट ! नॅचरल गॅस पुरवठ्यासाठी भारतीय रेल्वे चा गेल इंडिया बरोबर करार ! एप्रिल-जून १८ तिमाहीत विकास दर ७.६% अपेक्षित ! रेरा लागू झाल्यानंतरही अद्याप रु.४.६४ /- लाख करोड चे गृह प्रकल्प रखडले ! एन एस ई मध्ये टेक महिंद्रा, एच सी एल टेक, टी सी एस, इन्फोसिस, विप्रो तेजीत ! बी एस ई मध्ये लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक, क्वालिटी, नवीन फ्लुराईन, फिनिक्स मिल्स, एच सी एल टेक तेजीत !