आजच्या ठळक बातम्या सोमवार २८ मे २०१८ ! शेअर बाजारात तेजी ! निफ्टी निर्देशांक ८३.५० अंकांनी तर सेन्सेक्स २४०.६१ अंकांनी वर ! इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय विमान कंपन्या जगात किफायतशीर ! 'मुद्रा' योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्जांपैकी १४ हजार ३५८ कोटी रुपयांची कर्जे थकली ! जानेवारी-मार्च २०१८ या कालावधीत आय डी बी आय बँकेचा तोटा ५,६६३ कोटी रुपयांवर ! ल्युपिन कंपनीला चौथ्या तिमाहीत रु. ७७७/- करोडचा तोटा ! बँक ऑफ बडोदाला जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीत ३१०२ कोटी रुपयांचा तोटा ! साऊथ इंडियन बँकला चौथ्या तिमाहीत नफ्यात ५२% ची वाढ ! हिंदाल्कोला चौथ्या तिमाहीत नफ्यात २५% ची घट ! ब्रिगेड एन्टरप्राईजला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६३% ची घट ! बजाज फायनान्सला चौथ्या तिमाहीत नफ्यात ६१% ची वाढ ! एस्कॉर्टसला चौथ्या तिमाहीत नफ्यात दुपटीने वाढ ! जयप्रकाश असोसिएट्सला चौथ्या तिमाहीत रु.७९/- करोडचा तोटा ! एन एस ई मध्ये सन फार्मा, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, गेल, ल्युपिन तेजीत ! बी एस ई मध्ये जस्ट डायल, कॅन फिन होम, इंडिया बुल्स व्हेंचर्स, जम्मू अँड काश्मीर बँक, ओरिएंटल बँक तेजीत !