आजच्या ठळक बातम्या सोमवार २५ जून २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक ५९.४० अंकांनी तर सेन्सेक्स २१९.२५ अंकांनी खाली ! अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८ दिमाखदार सोहळा संपन्न ! बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मराठी उद्योजकांचा ऐतिहासिक कार्यक्रम ! भारतभरातून ८०० हुन अधिक उद्योजकांची उपस्थिती ! विनर्स अर्थसंकेत कन्सल्टन्सीचे लोकार्पण ! २२ प्रस्थापित ब्रँड व १२ प्रॉमिसिंग ब्रँडचा झाला सन्मान ! मराठी अभिमान गीताचे संगीतकार श्री. कौशल इनामदार, जेष्ठ अभिनेता श्री. पंकज विष्णू, विनर्सचे श्री. शशिकांत खामकर व मुरुड जंजिराच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील यांची विशेष उपस्तिथी ! दोन अंकी विकासदर गाठणे गरजेचे - पंतप्रधान ! देशभरात मिळून एक कोटी अकरा लाख व्यावसायिकांनी वस्तू व सेवा करामध्ये केली नोंदणी ! आयडिया आणि व्होडाफोन विलिनीकरण लांबले ! देशांतर्गत विमानप्रवासादरम्यान १५ किलोपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क ! आगामी ७ ते ८ वर्षांत अमेरिकेकडून १ हजार नागरी विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव ! विजय मल्ल्याची १२,५०० कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज ! लघू व मध्यम उद्योगांना भांडवली बाजारातून निधी उभारणे सोपे ! प्रारंभिक गुंतवणुकीची मर्यादा १० कोटींवरून २ कोटी रुपये ! एन एस ई मध्ये अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, इन्फोसिस, इंफ्राटेल, ल्युपिन तेजीत ! बी एस ई मध्ये पी एन बी हाऊसिंग, के ई सी, वक्रांगी, पेज इंडस्ट्री, टी टी के प्रेस्टिज तेजीत !