आजच्या ठळक बातम्या मंगळवार २३ ऑक्टोबर २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक ९८.४५ अंकांनी तर सेन्सेक्स २८७.१५ अंकांनी खाली ! देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात अधिक कर भरणारे राज्य ! देशाचा ३८ टक्के कर महाराष्ट्रातील करदाते भरतात ! पाच लाख पर्यंत उत्पन्न असणारा वर्ग सर्वाधिक कर भरतो ! गेल्या चार वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांमध्ये ८० टक्क्यांनी वाढ ! फक्त ४ करदाते १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कर भरतात ! ९३ टक्के करदाते दीड लाखाहूनही कमी कर भरतात ! तिसऱ्या तिमाहीत नेस्टले कंपनीच्या विक्रीत वाढ ! डी सी बी बँकला निव्वळ नफ्यात २५% ची वाढ ! ए सी सी सिमेंटला निव्वळ नफ्यात १५% ची वाढ ! दुसऱ्या तिमाहीत माइंडट्रीला नफ्यात वाढ ! दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओला रु. ६८१/- करोडचा नफा ! एन एस ई मध्ये हिंद पेट्रो, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, एच डी एफ सी, इंडसइंड बँक, यस बँक तेजीत ! बी एस ई मध्ये इंडसइंड बँक, टाटा मोटर्स डी व्ही आर, एच डी एफ सी, यस बँक, बजाज ऑटो तेजीत !