आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १७ ऑगस्ट २०१८ ! शेअर बाजारात तेजी ! निफ्टी निर्देशांक ८५.७० अंकांनी तर सेन्सेक्स २८४.३२ अंकांनी वर ! अर्थसंकेत प्रस्तुत 'डिजिटल इंडिया २०२० कॉनक्लेव्ह' कार्यक्रम संपन्न ! 'बेस्ट ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेल' पुरस्काराने 'प्लॅनेट मराठी', 'ऍप ऑफ दि ईअर' या पुरस्काराने 'डॉ ओ पी डी ऍप', 'बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर स्टार्टअप' या पुरस्काराने 'इंडिया आंत्रप्रिनिअर क्लब', 'बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप' या पुरस्काराने "दिवा स्टे", 'कॅप्टन क्लीन', 'ऍग्रो टुरिझम विश्व', 'बेस्ट ऑनलाईन मॅगझीन' या पुरस्काराने 'ग्राहक दृष्टी', 'बेस्ट ट्रेनिंग फॉर स्टार्ट अप' या पुरस्काराने 'उद्योग मेघ', 'इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट' पुरस्काराने 'मनोमय प्रकाशन', 'बेस्ट इन्क्युबेशन सेंटर' या पुरस्काराने 'अर्श इन्क्युबेशन सेंटर'चा सन्मान करण्यात आला. प्रवासी वाहन विक्रीत जुलैमध्ये घसरण ! मोटरसायकल विक्रीत ९.६७ टक्क्यांनी वाढ ! चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये एकूण वाहन विक्री एक कोटींवर ! जुलै महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री २,९०,९६० ! घाऊक किंमत महागाई निर्देशांकात अन्नधान्याच्या किंमती २.१६ टक्क्य़ांनी खाली ! डाळींच्या किंमती १७.०३ टक्क्य़ांपर्यंत घसरल्या ! तेल आयात खर्चात २६ अब्ज डॉलरच्या वाढीची शक्यता ! एल आय सीच्या कॅन्सर कव्हर’ योजनेतून २९.१६ कोटी संकलित ! रुपयाची घसरण हाताळण्यासाठी देशाकडे मुबलक परकीय चलनसाठा – जेटली ! चार वर्षांत ४,२१२ सायबर गुन्हे दाखल ! गेल्या चार वर्षांत क्रेडिट कार्ड क्लोनिंग करून फसवणुकीच्या १,५३२ गुन्ह्य़ांची नोंद ! एन एस ई मध्ये ग्रासिम, यस बँक, ल्युपिन, स्टेट बँक, टाटा मोटर्स तेजीत ! बी एस ई मध्ये एच डी आय एल, जी एम आर इन्फ्रा, एडेलवाईज, चम्बल फर्टिलायझर्स, डॉ. लाल पॅथ लॅब तेजीत !