आजच्या ठळक बातम्या सोमवार १२ नोव्हेंबर २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक १०३.०० अंकांनी तर सेन्सेक्स ३४५.५६ अंकांनी खाली ! रिझर्व्ह बँकेकडे ९.६० लाख कोटी रुपयांचा राखीव निधी असून या निधीचा योग्य विनियोग होत नसल्याचा सरकारचा आरोप ! चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ ! जानेवारी ते जून या कालावधीत भारतात सायबर हल्ल्याचे तब्बल ६.९५ लाख गुन्हे ! गेल्या पाच सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची भांडवल बाजारात ४,८०० कोटींची गुंतवणूक ! केंद्रीय निर्गुंतवणूक विभागातर्फे लवकरच शत्रू शेअर्सच्या विक्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार ! पाकिस्तान आणि चीनला कायमस्वरूपी गेल्यामुळे ज्यांची संपत्ती देशात राहिली आहे, अशा संपत्तीला शत्रू संपत्ती असे म्हणतात ! चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांनी ३६,५५१ कोटी रुपयांच्या थकित कर्जांची केली वसुली ! डॉ. रेड्डी लॅबला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ७०% ची वाढ ! रिलायन्स जनरलला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात २०% ची वाढ ! कोटक महिंद्रा बँकेला नफ्यात २१% ची वाढ ! टाटा पॉवर ला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ८८% ची वाढ ! एन एस ई मध्ये टायटन, टेक महिंद्रा, टाटा स्टील, कोटक बँक, एच सी एल टेक तेजीत ! बी एस ई मध्ये टाटा स्टील, कोटक बँक, इन्फोसिस, टी सी एस, लार्सन अँड टुब्रो तेजीत !