आजच्या ठळक बातम्या सोमवार १० डिसेंबर २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक २०५.२५ अंकांनी तर सेन्सेक्स ७१३.५३ अंकांनी खाली ! गरीब राज्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रमाण केवळ १० ते १५ टक्के ! नव्या औद्योगिक धोरणाचा अंतिम प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला ! उत्पादन क्षेत्राचा देशाच्या एकत्रित राष्ट्रीय उत्पादना मध्ये सध्या १६ - १७ टक्के वाटा ! सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांसाठी व्हॉटस्अॅप बँकिंग सेवा केली सुरू ! विदेशी चलन मायदेशात पाठविण्यामध्ये भारतीय अव्वल स्थानी ! प्रवासी भारतीयांनी चालू वर्षात ८० अब्ज डॉलर मायदेशी पाठवले ! नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण ५२८ अब्ज डॉलर विदेशी धन आपापल्या देशांमध्ये पाठविण्यात आले ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सरकारचे योगदान वाढवून १४ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय ! कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला पेन्शन फंडात जमा झालेल्या एकूण निधीपैकी ६० टक्के निधी देण्यालाही मंजुरी ! दुचाकींच्या विमा हप्त्याची रक्कम कमी होण्याचे संकेत ! येत्या काही वर्षात भारतात ६५ अब्ज अमेरिकी डॉलरचा खर्च करून १०० विमानतळांची उभारणी होणार ! नवीन फुड पार्कच्या माध्यमातून ३४ हजार लोकांना नोकरी देणार असल्याची पतंजली उद्योग समुहाची घोषणा ! पतंजली आंध्रप्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात ६३४ कोटी रुपये गुंतवूण विशाल फूड पार्कची स्थापना करणार ! एन एस ई मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बी पी सी एल, कोल इंडिया, हिंद पेट्रो, मारुती तेजीत ! बी एस ई मध्ये कोल इंडिया, मारुती तेजीत !