होलसेल प्राईझ इंडेक्स वर आधारित महागाई दरात घट होऊन हा दर ५.७०% झाला आहे. उत्पादित वस्तूंच्या किमतीत मार्च मध्ये घट झाल्याकारणाने हा दर कमी झाला असावा असा अंदाज आहे. परंतु अन्नपदार्थांच्या किमतीत मात्र मार्च मध्ये वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्यात होलसेल प्राईझ इंडेक्स ६.५५% होता. व अन्नपदार्थांच्या किमतीत मार्च मध्ये ३.१२% ची वाढ झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यात हि वाढ २.६९% होती. मार्च मध्ये भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाली होती. व फळांच्या किमतीत ७.६२% पर्यंत वाढ झाली होती. अंडी,मांस,मासे या पदार्थांच्या किमतीत ३.१२% पर्यंत वाढ झाली होती. इंधनाच्या दरात मार्च मध्ये घट होऊन हा दर १८.१६% होता. तर फेब्रुवारीत हा दर ३.६६% होता. महागाई दरात अधिक वाढ होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात पॉलिसी दरात बदल न करता हा दर ६.२५% ठेवला होता. व रिव्हर्स रेपो रेट मध्ये ६% पर्यंत वाढ केली होती. २०१७-१८ मध्ये रिटेल इन्फ्लेशन ४.५% राहील असा अंदाज आहे. रिटेल इन्फ्लेशन दरावरून RBI सामान्यतः मॉनेटरी पॉलिसी संदर्भात निर्णय घेत असते.