BCG - TiE अहवालानुसार, भारताच्या इंटरनेट क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत २०२० पर्यंत झपाट्याने वाढ होणार आहे. हि अर्थव्यवस्था $२५० बिलियन पर्यंत पोहोचेल. कारण ऑनलाईन युझर व मोबाईल डेटा वापरात मोठ्या संख्येने भर पडत आहे. सध्या हि अर्थव्यवस्था $१००-१३० बिलियन दरम्यान असून GDP मध्ये या अर्थव्यवस्थेचा सहभाग ५% आहे. त्यानुसार, इ -कॉमर्स व फायनान्स सर्विसेस चा सहभाग $४०-५० बिलियन तर इ -कॉमर्स प्रॉडक्ट चा सहभाग $४०- ५० बिलियन तर डिजिटल मीडिया चा सहभाग $५-८ बिलियन आहे. भारतात ३९१ मिलियन इंटरनेट युझर असून भारत याबाबतीत जगात २ ऱ्या स्थानावर आहे. तर २०२० पर्यंत हि संख्या ६५० बिलियन होणार आहे. तर डेटा वापरात १०-१४ पट वाढ होईल. ऑनलाईन मीडिया अँन्ड एंटरटेनमेंट मुळे ऑनलाईन विडिओ डेटा वापरात देखील मोठी भर पडेल.