हाऊसिंग अँन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०१७ अखेर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.२१०.८५/- करोड आहे. तर मागील वर्षी हि रक्कम रु.१३८.७४/- करोड होती. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीला या तिमाहीत एकूण महसूल रु.९२९.०८/- करोड असून त्यात वार्षिक ४.२६% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.८९१.११/- करोड होती. २०१७-१८ च्या पहिल्या तिमाहीत एकूण नफा रु. २११.९७/- करोड असून मागील वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला रु.२०४.४३/- करोड चा एकूण नफा झाला होता. कंपनीची एकूण अनुत्पादित मालमत्ता ७.२०% असून मार्च २०१७ अखेर तिमाहीत हे प्रमाण ६.०२% होते.