शुक्रवारी HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१७ अखेरीस तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक १८.२५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.३९९०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने रु.३३७४.२२/- करोड चा निव्वळ नफा कमविला होता. जानेवारी ते मार्च २०१७ दरम्यान, कंपनीला रु.३९५०/- करोड चा निव्वळ नफा होईल असा अंदाज होता. बँकेने आपत्कालीन तरतुदीत देखील या तिमाहीत ९०.४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.१२६१.८०/- करोड आहे. मागील वर्षी तिमाहीत हि रक्कम रु.६६२.४५/- करोड होती. जानेवारी ते मार्च २०१७ दरम्यान बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात २१.४९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.९०५५.१०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.७४५३.३४/- करोड होती. बँकेच्या एकूण अनुत्पादक मालमत्ता प्रमाणात बदल झाला नसून हे प्रमाण १.०५% आहे.