येत्या १ जुलैपासून जमिनीच्या भाडेपट्यावर तसेच बिल्डिंगच्या भाड्यावर व खरेदी केलेल्या घराच्या EMI वर GST लागू होईल. जमीन अथवा बिल्डिंग च्या विक्रीवर मात्र GST अद्याप लागू झालेला नाही. अश्या व्यवहारांवर स्टॅम्प ड्युटी लावण्यात येईल असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. १ जुलै २०१७ पासून लागू होणाऱ्या GST मुळे सेंट्रल एक्साईज,सर्विस टॅक्स, VAT जाऊन एकच टॅक्स भरावा लागेल. तसेच कोणतीही बिल्डिंग अथवा कॉम्प्लेक्स कमर्शिअल अथवा रेसिडेन्शिअल तत्वावर भाड्याने दिल्यास त्यावर GST आकारण्यात येईल. टॅक्स एक्स्पर्ट च्या मते सध्या कमर्शिअल व इंडस्ट्रिअल युनिट वर आकारले जाणाऱ्या भाड्यावर सर्विस टॅक्स लागू होतो. परंतु रेसिडेन्शिअल युनिट वर होत नाही. GST मुळे एक्साईज,सर्विस टॅक्स, VAT , करमणूक टॅक्स , लक्झरी टॅक्स सारखे कर जातील परंतु इलेकट्रीसिटी ड्युटी देणे आवश्यक राहील. परंतु दिल्लीसारखी काही राज्ये रेसिडेन्शिअल युनिट वर इलेकट्रीसिटी ड्युटी आकारात नाही.