फ्युचर लाईफस्टाईल फॅशन ने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१७ अखेर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु.१८.९३/ - करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.५.२२/- करोड होती. ऑपरेशनल उत्पन्न रु.९८७.७३/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.८५०.१७/- करोड होती. त्यात १३.९% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने ली कूपर ब्रँड ला स्वतंत्र कंपनीत रूपांतरित केले असून या कंपनीवर जास्त लक्ष केंद्रित करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रति शेअर ८० पैश्यांचा लाभांश कंपनीने भागधारकांना दिला आहे.