रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील भारतीय कंपन्यांकडून विदेशात होणाऱ्या थेट गुंतवणुकीत ४७% ची घट झाली असून हि रक्कम $ १.७७ बिलियन आहे. मागील वर्षी या महिन्यात $३.३५ बिलियन ची गुंतवणूक भारतीय कंपन्यांनी केली होती. भारतीय कंपन्यांनी केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी $९००.६६ मिलियन इशुअन्स ऑफ गॅरंटी, $५१३.८१ कर्ज, $३५३.५५ मिलियन इक्विटी गुंतवणूक स्वरूपातील आहेत. जून २०१७ मध्ये हि गुंतवणूक $१.११ बिलियन होती. मुख्य गुंतवणूकदारांमध्ये SAS हॉटेल्स अँन्ड एन्टरप्राइझेस व इंटस फार्मा यांचा समावेश आहे. SAS ने सिंगापूर मधील कंपनीत $३६० मिलियन ची गुंतवणूक तर इंटस ने स्पेन व UK मध्ये $६८.६६ मिलियन ची गुंतवणूक केली आहे. व ONGC विदेश लिमिटेड ने $५१.८८ मिलियन ची गुंतवणूक केली आहे.