२०१७-१८ च्या पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेच्या नफ्यात २६% ची वाढ झाली आहे. हि रक्कम रु. २१०.१५/- करोड आहे. बँकेला या तिमाहीत रु.५५७.८६/- करोड चा ऑप्रेशनल नफा झाला असून त्यात ३१% ची वाढ झाली आहे. तसेच बँकेच्या एकूण व्यवसायात २३% ची वाढ झाली आहे. एकूण व्यवसाय रु.१,७२,१४५.९५/- करोड असून ठेवींमध्ये १८% ची वाढ झाली आहे. बँकेकडे एकूण रु. ९५,८३८.८४/- करोड च्या ठेवी आहेत. अनिवासी भारतीयांकडून ठेवींमध्ये १६.३४% ची वाढ झाली असून रु.३७,३७०.४६/- करोड आहे. बँकेच्या बचत व चालू खात्यामध्ये ठेवींमध्ये २०% ची वाढ झाली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न १५.६८% नि वाढले असून या तिमाहीत हि रक्कम रु.८००.६८/- करोड आहे. तर ३० जून अखेर निव्वळ व्याज मार्जिन ३.१३% आहे. या तिमाहींअखेर बँकेची एकूण अनुत्पादित मालमत्ता रु. १८६७.९४/- करोड आहे. तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता रु. १०६१.२६/- करोड आहे.