बॅटरी निर्माण क्षेत्रातील एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया ने यांच्या चेन्नई मधील जागेची विक्री ओलंपिया ग्रुप फर्मला रु.१००/- करोड ला केली. कंपनीने याकरिता सेल अग्रीमेंट पूर्ण केले आहे. हा व्यवहार पुढील ४ ते १० महिन्यात पूर्ण होईल. मागील १० दशके कंपनीची बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी या जागेवर कार्यरत होती. परंतु हि फॅक्टरी आता आर्थिक दृष्टया कंपनीला फायदेशीर नव्हती . व त्यांचा कंपनी कामकाजावर कोणताही परिणाम होत नव्हता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक , अमृतांशी खेतान म्हणाले, या विक्रीनंतर कंपनीवरील कर्जात घट होईल. फॅक्टरी बंद झाल्यामुळे कंपनीच्या खर्चात कपात होणार असून नफ्यात वाढ होईल.