सुभाष चंद्रा यांच्या मालकीच्या एस्सेल ग्रुप च्या क्रूज बिजनेस - झेन क्रुझेस ने घोषित केली कि, त्यांच्या जलेश क्रूज लाईन ची सेवा एप्रिल २०१९ पासून सुरु होईल. यामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, साहसी कार्यक्रम, विविध पाककृती यासोबत इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी चा आनंद घेता येईल. अशी माहिती कंपनीने सोमवारी दिली. मागील वर्षी ३ सप्टेंबर ला मिळालेल्या माहितीनुसार, क्रूज व्यवसायात चंद्रा $१०० मिलियन हुन अधिकची गुंतवणूक करतील. जलेश अथवा लॉर्ड ऑफ वॉटर या ब्रँड ने ते सुरु होईल. कॉर्पोरेट, लग्न नियोजक आणि कार्यक्रम आयोजक, व्हेकेशनर्स याकरिता हि सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचे पहिले जहाज मुंबई येथून एप्रिल २०१९ ला प्रवास करेल. झेन क्रुझेस भारतीय नागरिकांना देशांतर्गत व विदेशात प्रवास सेवा पुरवते. चेन्नई, कोची, मुंबई, विझाग , अबू धाबी, कोलंबो, दुबई, मस्कत, सिंगापूर येथे किनाऱ्यालगत असलेल्या विविध ठिकाणांना भेट देण्याकरिता हि कंपनी सेवा पुरवते.