डॉलर इंडस्ट्रीज ने दिलेल्या अहवालानुसार, २०१७-१८ आर्थिक वर्षात कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ४८% ची वाढ होऊन हि रक्कम रु. ६४.२५/- करोड आहे. २०१६-१७ मध्ये कंपनीला रु. ४३.४६/- करोड चा नफा झाला होता. या कालावधीत एकूण महसूल रु.९८४.५२/- करोड असून मागील वर्षी हि रक्कम रु. ८८७.५३/- करोड होती. या वर्षात करासहित नफा रु. ९५.८/- करोड असून २०१६-१७ मध्ये हि रक्कम रु. ६६.७५/- करोड होती. हि कंपनी कोलकत्ता येथे कार्यरत असून नेपाळ, मिडल ईस्ट, गल्फ देशांमध्ये देखील व्यवसाय करते.कंपनीचे कोलकत्ता ,लुधियाना , दिल्ली, तामिळनाडू येथे उत्पादन युनिट्स आहेत. कंपनीच्या मुख्य अम्ब्रेला ब्रँड अंतर्गत डॉलर बिग बॉस, डॉलर क्लब, फोर्स गो वेअर, चॅम्पियन इत्यादी उप ब्रँड आहेत.