हौसिंग फायनान्स कंपनी DHFL ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१२.४०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने रु. २४८.२०/- करोड होती. एकूण उत्पन्न १८% ने वाढले असून हि रक्कम रु. २८०८.२०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २३७७.७०/- करोड होती. या तिमाहीत एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ०.९६% असून नेट इन्टरेस्ट मार्जिन ३.०३% आहे. आऊटस्टँडिंग लोन बुक मध्ये २८% ची वाढ झाली आहे. तर या तिमाहीत एकूण रु.१५,७६८/- करोड चे लोन वितरित केले आहे. कंपनीचे अध्यक्ष कपिल वाढवण म्हणाले,हौसिंग फायनान्स क्षेत्राकरिता हे आर्थिक वर्ष उत्तम राहिले असून प्रगतीसाठी संधी निर्माण झाल्या आहेत.