सप्टेंबर २०१८ अखेर तिमाहीत DCB बँक ला निव्वळ नफ्यात २५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु.५९/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. मोर्गेजेस व रूरल लोन ला मागणीत वाढ झाल्याने हा नफा झाला आहे. तसेच लोन बुक मध्ये २७% ची वाढ झाली आहे. रु.२२,०६९/- करोडचे कर्ज वितरण बँकेने केले आहे. तर निव्वळ व्याज उत्पन्नात १४% ची वाढ झाली आहे. रिटेल, MSMS / SME , ऍग्री , इन्क्लुझिव्ह बँकिंग यामध्ये प्रगती करण्याचा मानस असून कॉस्ट प्रॉडक्टिव्हिटी वर भर दिल्याने फायदा झाला आहे. अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरली नटराजन म्हणाले. कृषी कर्जात ३६% ची वाढ व मोर्गेजेस मध्ये २८% ची वाढ झाली आहे. कॉर्पोरेट लोन मध्ये १५% ची वाढ झाली आहे. तसेच डिपॉझिट्स मध्ये २७% ची वाढ झाली आहे. बँकेच्या कॉस्ट ऑफ फंड मध्ये ६.५९% ची वाढ झाली आहे.