FMCG क्षेत्रातील डाबर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१७ अखेर तिमाहीत कंपनीला रु.३३३.११/- करोड चा निव्वळ नफा झाला आहे. नफ्यात ०.४९% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी तिमाहीत हि रक्कम रु.३३१.४८/- करोड होती. एकत्रित उत्पन्नात ४% ची घट झाली असून हि रक्कम रु.१९७९.७/- करोड आहे .तर मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.२०६३.९३/- करोड होती. रु.१/- चा लाभांश प्रति इक्विटी शेअर कंपनीने जाहीर केला आहे. हि रक्कम रु.२१२.०१/- करोड आहे. टॅक्स सहित आँफ रु.४३१.४१/- करोड असून त्यात २.६९% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी हि रक्कम रु.४२०.१०/- करोड होती. फूड व्यवसायातून महसुलात ८.१८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.२९८.०१/- करोड आहे. कंझ्युमर केअर व्यवसातील महसुलात ६.७९% ची घट झाली आहे. हि रक्कम रु.१५५०.८४/- करोड आहे.