सियांत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६% ची घट झाली असून हि रक्कम रु. ८२.५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ८७.८/- करोड चा नफा झाला होता. रु.१०८०/- करोड चा महसूल या तिमाहीत मिळाला असून त्यात १९% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत अपेक्षेप्रमाणे अहवाल आला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा बोडनप म्हणाले. . कंपनीला एअरोस्पेस, डिफेन्स, ट्रान्सपोर्टेशन, सेमीकंडक्टर , अनॅलिटीक्स बिझनेस या युनिट्स मधून नफा झाला आहे. २०१९ मध्ये कामगिरीत वाढ करून ऑपरेटिंग नफा वाढविण्याचे ध्येय आहे.असे ते म्हणाले.