टेलिकॉम क्षेत्रातील भारती एअरटेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६५.३६% ची घट झाली असून हि रक्कम रु.११८.८०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.३४३/- करोडचा नफा झाला होता. या तिमाहीत एकत्रित महसूल रु. २०,४२२.५०/- करोड आहे. मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत महसुलात ६.२०% ची घट झाली आहे. प्रति युझर महसुलात २८.८०% ची घट झाली असून रु.१०१/- चा महसूल मिळाला आहे. व्याज,कर, घसारा सहित उत्पन्नात २०.७०% ची घट झाली असून हि रक्कम रु.६३४३/- करोड आहे. कंपनीचे एकूण ४४५ मिलियन ग्राहक असून त्यात १४.२% ची वाढ झाली आहे. मोबाईल डेटा ट्राफिक मध्ये २२३.२% ची वाढ झाली आहे. तसेच कंपनीवर कर्जात वाढ झाली असून हि रक्कम रु.१०,३०१.४०/- करोड आहे.