BEML ने आज दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून रु.१४२१ करोड चे मेट्रो कार पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. BSE ला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे कि, त्यांना बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून १५० सीट इंटरमीजिएट मेट्रो कार निर्मितीचे काम मिळाले आहे. BMRCL चे व्यवस्थापकीय संचालक, प्रदीप सिंग करोल व BEML चे मुख्य कार्यकारी संचालक दीपक कुमार होटा या दोहोंनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. जुन २०१८ BEML या इंटरमिजिएट मेट्रो कार चा BMRCL ला पुरवठा करेल. डिसेंबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. २००२ पासून BEML हाय टेक अश्या मेट्रो कार ची निर्मिती व पुरवठा करीत असून अद्याप त्यांनी दिल्ली, बंगलोर, जयपूर मेट्रो कॉर्पोरेशन यांना १००० हुन अधिक कार चा पुरवठा केला आहे.