डिसेंबर अखेर तिमाहीत खाजगी क्षेत्रातील बँकांच्या उत्तम कामगिरीमुळे बँक क्रेडिट मध्ये ३.४% ची वाढ झाली आहे. सलग दोन तिमाहीत इंडस्ट्रियल क्रेडिट मध्ये घट झाल्यानंतर डिसेंबर अखेर तिमाहीत क्रेडिट मध्ये वाढ दिसून आली. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर १७ अखेर तिमाहीत रु.८०.६२ /- ट्रिलियन चे बँक क्रेडिट दिले असून सप्टेंबर १७ अखेर तिमाहीत रु.७७.95/- ट्रिलियन चे बँक क्रेडिट दिले आहे. क्रेडिट मधील हि वाढ सर्व लोकसंख्या गट आणि सर्व मोठ्या उद्योगांसाठी झाली आहे. खाजगी क्षेत्रातील सर्वच बँकांना लोन पोर्टफोलीओ मध्ये वाढ करणे शक्य झाले आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांना कर्ज वाटपात या तिमाहीत ४.८८% ची वाढ झाली असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २.९६% ची वाढ झाली आहे. एकूण कर्ज वाटपात हौसिंग विभागाकरिता ४७.३% कर्ज वाटप झाले आहे. डिसेंबर १७ अखेर सरासरी कर्जवरील व्याजदर १०.४४% होता.