FMCG क्षेत्रातील बजाज कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५.३०% ची वार्षिक वाढ झाली आहे व हि रक्कम रु.५४.९७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.५२.२०/- करोड होती. कंपनीच्या महसुलात ७.१७% ची घट झाली आहे. हि रक्कम रु.१९७.४३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीच्या महसुलाची रक्कम रु. २१२.६८/- करोड होती. कंपनीच्या उत्पन्नात १४.११% ची घट झाली आहे. व हि रक्कम रु. ६१.८९/- करोड आहे. मागील वर्षी हि रक्कम रु. ७२ .०६/- करोड होती. बजाज कॉर्पोरेशन हि कंपनी सौंदर्य प्रसाधने आणि इतर वैयक्तिक काळजी उत्पादने निर्मिती मध्ये कार्यरत आहे. ३० जून २०१७ अखेर कंपनीचे एकूण भांडवल रु.३८४.९८/- करोड आहे.