भारतात तसेच परदेशात विस्तारित होण्याचे ऍक्सिस बँकेचे ध्येय असून या वर्षभरात बँक रु.३५,०००/- करोडचा फंड याकरिता जमा करणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय मार्केट मधून हा निधी जमवेल. बँकेला त्यांचा कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो संतुलित ठेवण्यासाठी या फंडाची गरज आहे. २६ एप्रिल २०१७ ला झालेल्या बोर्ड मीटिंग मध्ये या साठी मंजुरी मिळाली आहे. या वितरणात बँक मुख्यतः लॉन्ग टर्म बॉण्ड, ग्रीन बॉण्ड्स, नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स यांची विक्री करेल. तसेच बँकेच्या २०१६-१७ वार्षिक अहवालानुसार, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांच्या वार्षिक वेतनात ५.९% ची वाढ झाली आहे. त्यांचे या वर्षीचे एकूण वेतन रु.५.८२/- करोड असेल. शेअर होल्डर ना दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले कि, २०१६-१७ या वर्षात बँकेला बऱ्याच समस्या आल्या व त्यातून आम्ही मार्ग काढत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.