अव्हेन्यू सुपरमार्टचे रमेश दमाणी डी - मार्ट सुपरमार्ट चेन चे मालक असून ते सध्या त्यांच्या वितरित होणाऱ्या IPO साठी रोड शोज करण्यात व्यग्र आहेत. रु.१८७०/- करोड चे IPO वितरण रु.२९५/- ते रु.२९९/- प्रति शेअर किमतीत उपलब्ध असतील. ८ मार्च ते १० मार्च दरम्यान हे वितरण होईल. हि सर्वाधिक फायद्यात असलेली सुपरमार्ट चेन असून पश्चिम भारतात त्यांचे सर्वाधिक स्टोर्स आहेत. दक्षिण व मध्य भारतात नेटवर्क विस्तारित करण्याचा त्यांचा विचार आहे. कंपनी रु.१०८०/- करोड कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार असून उर्वरित रक्कम रु.३६६.६०/- करोड नव्या स्टोअर्स च्या सेटअप साठी वापरले जातील. आर्थिक वर्ष २०१२ ते २०१६ दरम्यान ऑपरेशनल महसूल ४०.४% नि वाढला असून नफ्यात ५१.६% ची वाढ झाली आहे. २०१६ मध्ये कंपनीने रु.८६०६/- करोड चा महसूल मिळवला असून एकत्रित नफा रु.३२०.९/- करोड आहे.