बी एस ई एस एम ई चे प्रमुख श्री. अजय ठाकूर यांनी लघु व मध्यम उद्योगांनी शेअर बाजारात नोंदणी करून भांडवल उभारणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. अर्थसंकेतच्या माध्यमातून आपण सर्व आज इथे जमला आहात. आपण सर्व उद्योगपती महाराष्ट्रातील लहान लहान भागातून जरी आला असलात तरी आपण सर्वानी खुप मोठी उंची गाठली आहे व आपल्या सर्वाना मला नमन करावेसे वाटते. शेअर बाजारात नोंदणी केलेल्या अनेक कंपन्यांनी करोडो रुपयांची संपत्ती कमविले आहे. आज जगभरात जेव्हढ्या कंपन्या मोठ्या झाल्या आहेत त्या शेअर मार्केट मध्ये नोंदणीकृत आहेत. आपल्याला आपली कंपनी मोठी करायची असेल तर शेअर बाजारात नोंदणी करून भांडवल उभारणे आवश्यक आहे. या भांडवलाचे विशेष म्हणजे यावर बँकेसारखे व्याज द्यावे लागत नाही. गेल्या सहा वर्षांत मी भारतातील जवळपास २८,००० लघु व मध्यम उद्योजकांना भेटलो आहे व त्यातील जवळपास ३०० कंपन्यांची नोंदणी BSE SME Index मध्ये झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक लघु व मध्यम कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये नोंदणी केली आहे. शेअर मार्केट मधील नोंदणीमुळे आपल्या व्यवसायाचा ब्रँड जगभर पोहोचतो. आपल्या व्यवसायाला मोठे करण्यासाठी, ब्रँड बनिवण्यासाठी व भांडवल उभारणी करण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. महाराष्ट्राचा महासन्मान - अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८" बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मराठी उद्योजकांचा दिमाखदार व ऐतिहासिक सोहळा ! मराठी उद्योगजगतातील सर्वात भव्यदिव्य कार्यक्रम - उपस्थितांची प्रतिक्रिया ! अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ Website - http://arthsanket.in/ FaceBook - https://www.facebook.com/arthsanket #Grandestofthegrandevent #Mahabrand2018 #Arthsanket #G5WebServices #NeevStone #BSE